
श्री साई मंदिर
मंदिराविषयी माहिती
श्री साईमंदिर हे श्रद्धा, सबुरी आणि सेवाभाव या श्री साईबाबांच्या पवित्र तत्त्वांवर आधारित एक पावन आध्यात्मिक स्थान आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांतता, समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव मिळावा, हा आमचा सतत प्रयत्न आहे.
या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे श्री साईबाबांचा पवित्र दात, उदी आणि चिलम जतन करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे स्थान साईभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचे आणि पवित्र मानले जाते.
मंदिराचे वेळापत्रक
साई मंदिरातील पूजेचा कार्यक्रम
सकाळी ६:००
मंदिर खुले, काकड आरती
सकाळी ७:००
मंगल स्नान
दुपारी १२:००
मध्याह्न आरती
सायंकाळी ७:००
धूप आरती
रात्री १०:००
शेज आरती

साई मंदिरातील कार्यक्रम
श्री साईदास मंडळ / श्री साईबाबा मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उत्सव आणि भक्तिमय कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक उत्सवाचे धार्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी खालील कार्यक्रमांची माहिती पाहा.

कार्यक्रम
गुरु पौर्णिमा
29 जुलै, 2026
श्रीसाईबाबांच्या जीवनकाळात, प्रसाराचे तुटपुंजे साधन असूनही, जगभरातून लोक शिर्डीला येतात आणि बरेच दिवस मुक्काम करतात.

कार्यक्रम
मोगरा महोत्सव
21 मे, 2026
मोगरा महोत्सव गुरु पौर्णिमा श्री साईदास मंडळ / श्री साईबाबा मंदिरात साजरा होणारा मोगरा महोत्सव हा भक्ती, सुगंध आणि श्रद्…

कार्यक्रम
चंदन उटी महोत्सव
17 मे, 2026
चंदन उटी महोत्सव गुरु पौर्णिमा श्री साईदास मंडळ / श्री साईबाबा मंदिरात साजरा होणारा चंदन उटी महोत्सव हा भक्ती, शीतलता आण…
साई मंदिरातील सामाजिक उपक्रम
श्री साईदास मंडळ / श्री साईबाबा मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून समाजसेवेचे एक प्रेरणादायी केंद्र आहे. साईबाबांच्या “श्रद्धा आणि सबुरी” तसेच “सबका मालिक एक” या संदेशाचा वारसा जपत मंडळ विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असते.



