श्री साई मंदिर
मंदिराविषयी माहिती
श्री साईमंदिर हे श्रद्धा, सबुरी आणि सेवाभाव या श्री साईबाबांच्या पवित्र तत्त्वांवर आधारित एक पावन आध्यात्मिक स्थान आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांतता, समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव मिळतो. या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे श्री साईबाबांचा पवित्र दात, उदी आणि चिलिम जतन करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे स्थान साईभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचे आणि पवित्र मानले जाते.
या पवित्र वस्तूंमागे एक प्रेरणादायी इतिहास आहे. काशीबाई फसले या विधवा महिलेवर श्री साईबाबांची विशेष कृपा होती. एकदा बाबांनी त्यांचा हलणारा दात काढून, त्यासोबत उदी देऊन पुडीत बांधून आशीर्वाद दिला. काशीबाईंनी तो दात ताईत करून आपल्या मुलगा माधवच्या दंडावर बांधला. पुढे माधव आजारी असताना बाबांनी स्वप्नात दर्शन देऊन तो ताईत एका साईभक्ताला देण्यास सांगितले. यानंतर खेड येथील साईभक्त नामदेव निकम (निवृत्त हवालदार पोलीस) यांना स्वप्नदृष्टांत झाला आणि त्यांनी माधव यांच्याकडून तो ताईत प्राप्त केला. पुढे हा ताईत आणि श्री साईबाबांनी वापरलेली चिलिम हे साईंचे परमभक्त कै. श्री. दामुअण्णा सावळेराम रासने यांचे चिरंजीव कै. श्री. दत्तात्रय (नानासाहेब) रासने (माजी विश्वस्त श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी) यांना सुपूर्द करण्यात आले. कै. श्री. दत्तात्रय (नानासाहेब) रासने यांनी या पवित्र वस्तूंचे जतन करून त्यांची भक्तिभावाने सेवा केली. आज श्री साईबाबांचा पवित्र दात, उदी आणि चिलिम या मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
श्री साई मंदिरात दररोज आरती, भजन, नामस्मरण, गुरुवार विशेष पूजा तसेच श्री साईबाबांच्या प्रमुख उत्सवांचे भक्तिभावाने आयोजन केले जाते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजोपयोगी आणि सेवाभावी उपक्रमांद्वारे साईबाबांचा “श्रद्धा आणि सबुरी” तसेच “सबका मालिक एक”हा संदेश समाजात रुजविण्याचे कार्य आम्ही सातत्याने करत आहोत.
आमचे ध्येय म्हणजे श्री साईबाबांच्या शिकवणीचा प्रसार करून प्रत्येक भाविकाला भक्ती, सेवा आणि मानवतेच्या मार्गावर प्रेरित करणे, तसेच सर्वांसाठी श्रद्धा, शांती आणि आध्यात्मिक समाधानाचे पवित्र केंद्र म्हणून या साईमंदिराची परंपरा जपणे.
साई मंदिरातील कार्यक्रम
श्री साईदास मंडळ / श्री साईबाबा मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उत्सव आणि भक्तिमय कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक उत्सवाचे धार्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी खालील कार्यक्रमांची माहिती पाहा.

कार्यक्रम
गुरु पौर्णिमा
29 जुलै, 2026
श्रीसाईबाबांच्या जीवनकाळात, प्रसाराचे तुटपुंजे साधन असूनही, जगभरातून लोक शिर्डीला येतात आणि बरेच दिवस मुक्काम करतात.

कार्यक्रम
मोगरा महोत्सव
21 मे, 2026
मोगरा महोत्सव गुरु पौर्णिमा श्री साईदास मंडळ / श्री साईबाबा मंदिरात साजरा होणारा मोगरा महोत्सव हा भक्ती, सुगंध आणि श्रद्…

कार्यक्रम
चंदन उटी महोत्सव
17 मे, 2026
चंदन उटी महोत्सव गुरु पौर्णिमा श्री साईदास मंडळ / श्री साईबाबा मंदिरात साजरा होणारा चंदन उटी महोत्सव हा भक्ती, शीतलता आण…
